मनोगत
लोकशाही पद्धतीत निवडणुका ह्या निधर्मी आणि निःस्वार्थी पद्धतीने होणे तसेच त्या विषमतेपासून अस्पर्श असणे व त्यात स्पर्धा असली, तरी ती निखळ असणे अपेक्षित असते. तसे ते याखेपेस झालेले नाही. उलट, यावेळेच्या निवडणुकांत विविध पक्षाच्या शीर्ष व इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांवरील गरळ ओकण्याचा नीचांक गाठल्याचे उघड-उघड दिसते. तसेही प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा स्तर हा आधीच्या …